मला वाचनाचे, पुस्तके घेण्याचे, त्यात बुडून जाण्याचे व्यसन आहे आणि ते जन्मभराची सोबत करणारे आहे
ग्रंथ हे आपले ‘गुरू’ असलेच तर ते फार थोडा वेळ! ते सदासर्वकाळचे आपले स्नेही असतात. म्हणूनच ग्रंथव्यसनी माणसाला ग्रंथांचा कंटाळा कधीही येत नाही. आपण अज्ञानी आहोत, हे आपणास व्यवहारात पदोपदी येणाऱ्या अनुभवावरून चांगलेच पटलेले असते. त्यासाठी ग्रंथवाचन कोणी करू म्हणेल, तर त्याच्या पदरी निराशा येणारच. एखादा हेतू मनात ठेवून केलेल्या वाचनातून निर्भेळ आनंद मिळत नाही, असा माझा तरी अनुभव आहे.......